मुंबई: महाराष्ट्रात या आठवड्यातही पाऊस सुरुच राहिल. मुंबई हवामान केंद्राने महाराष्ट्रातील विविध भागात हलका ते मध्यम पाऊस कोसळेल, अशी शक्यता व्यक्त केली आहे. हवामान विभागाने सोमवारी सातारा, सांगली, सोलापूर, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गढचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. तर मंगळवारसाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबादमध्ये यलो अलर्ट असेल.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारसाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम राहील. तर गुरुवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूरसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यानंतरच्या शुक्रवार आणि शनिवारीही हलका ते मध्यम पाऊस कोसळेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यापूर्वी रविवारी राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरूच राहिला. दुसरीकडे राज्यातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक चांगला ते समाधानकारक अशा स्थितीत राहिला आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर या प्रमुख ठिकाणी पाऊस कोसळण्याचे अनुमान वर्तविण्यात आले आहे.