साओ पावलो : यामाहाने FZ-१५ मोटरसायकल ब्राझीलच्या मार्केटमध्ये लाँच केली आहे. या बाईकचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हे इथेनॉलसोबत पेट्रोलवरही चालते. याशिवाय, कंपनीने याचे डिझाइन आणि एक्सटीरीअर आकर्षक बनविण्यासाठी अनेक बदल केले आहेत.
प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, या बाईकला ब्राझीलमध्ये Fazer FZ-१५ या नावाने ओळखले जाते. याचे अपडेट व्हर्जन भारतामध्ये FZ V३ या रुपात सादर केली जाईल अशी शक्यता आहे. सद्यस्थितीत कंपनीकडून भारतात ही बाईक कधी लाँच होईल, याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, देशात पुढील वर्षापर्यंत बाईक लाँच होईल अशी शक्यता आहे.
दुसरीकडे, आता याला आता एक अपडेटेड सेटअप मिळू शकतो, जो भारतीय बाजारात विक्री केली जाणारी मोठी FZ२५ मोटरसायकलच्या समकक्ष असेल. २०२३ साठी बाईकचे रेसिंग ब्लू, मिडनाइट ब्लॅक आणि मॅग्मा रेड अशा तीन रंगांचा पर्यायासोबत अपटेड करण्यात आले आहे. तर फ्यूएल टँकची क्षमता घटवून ११.९ लिटर करण्यात आली आहे. याचा सिंगल सिलिंडर, १४९ सीसी इंजिनी पेट्रोल, गॅसोलीनसोबत इथेनॉलच्या इंधनावरही चालविण्यास सक्षम आहे. इंजिनीला १२.२ bhp पॉवर आणि १२.७ Nm चा टार्क देण्यात आला आहे. तर ही बाईक भारतीय बाजारात २०२३ ला सादर केली जावू शकते.