थकीत ऊस बिले तात़डीने न दिल्यास आंदोलनाचा इशारा

लखिमपुर खिरी : खिरी जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसोबत थकीत ऊस बिलांबाबत शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सवित मलिक यांनी चर्चा केली. ऊस बिले लवकर देण्याबाबत चर्चा केली. याबाबत जिल्हा ऊस अधिकाऱ्यांशी चर्चा करुन ऊस बिले न देणाऱ्या साखर कारखान्यांच्या साखर साठ्याची तपासणी करण्यासाठी समिती स्थापन करावी अशी मागणी त्यांनी केली.

शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सवित मलिक यांनी सांगितले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले खूप दिवसांपासून थकीत आहेत. त्यामुळे याबाबत जिल्हा ऊस अधिकारी वेद प्रकाश सिंह यांच्याशी चर्चा केली आहे. साखर कारखाने शेतकऱ्यांना पैसे देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना आपलं मुलांची शैक्षणिक फी भरणेही कठीण बनले आहे. मुलांच्या लग्न समारंभ तसेच औषधोपचारासाठी पैसे नाहीत. यामुळे काही शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कारखानदारांनी संपूर्ण साखरेची विक्री केली असली तरी शेतकऱ्यांना पैसे दिले नसल्याचे त्यांनी सांगितले. खरेतर सरकारी आदेशानुसार साखर विक्रीपैकी ८५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना ऊस बिलांच्या रुपात देणे बंधनकारक आहे. मात्र कारखानदार जादा साखर विक्री करतात आणि शेतकऱ्यांना कमी पैसे देतात. जिल्हा ऊस अधिकारी वेद प्रकाश सिंह यांना साखर कोट्याची तपासणी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. जर लवकरात लवकर ऊस बिले मिळाली नाहीत तर शेतकरी आंदोलन करतील असा इशारा त्यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here