देशातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे लोकांचे हाल सुरू आहेत. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, आजही अनेक राज्यांमध्ये पाऊस सुरू राहण्याची अपेक्षा आहे. हवामान खात्याने देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. देशात पुढील २४ तासांत उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, आसाम, सिक्कीम, ईशान्य उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात तीन सप्टेंबरपर्यंत गडगडाटासह पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय, मध्य महाराष्ट्र आणि किनारी कर्नाटकात पावसाची शक्यता आहे.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, पुढील २४ तासात उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्किम, आसाम, बिहारच्या काही भागात, पूर्वोत्तर उत्तर प्रदेश, मध्य महाराष्ट्र, कर्नाटकची किनारपट्टी आदी काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. पूर्वोत्तर भारतममध्ये तसेच पश्चिम बंगाल, बिहारच्या उर्वरित भागात झारखंड, छत्तीसगढ, विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, तामीळनाडू, अंदमान तसेच निकोबार द्वीप समुह, उत्तराखंड तसेच कोकण, गोव्याच्या काही भागात मध्यम ते हलका पाऊस कोसळेल. तर बिहारमध्ये एक आणि २ सप्टेंबर रोजी पावसाची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश किनारपट्टी, गुजरातचा काही भाग आणि पूर्व राजस्थानमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेशची किनारपट्टी, कोकण आणि गोवा आणि दक्षिण गुजरातमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.