जालंधर : पंजाबमधील फगवाडा शहरात साखर कारखान्यासमोरील महामार्गावर धरणे सुरू ठेवलेल्या शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन करण्याची योजना रद्द केली आहे. हरियाणातील भूना (फतेहाबाद) येथे पंजाब सरकारचा जो साखर कारखाना होता, त्याची विक्री झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या विक्रीचे रजिस्ट्रेशन झाले असून शेतकऱ्यांना लवकरच पैसे मिळतील अशी अपेक्षा आहे. भारतीय शेतकरी युनियन दोआबाने सोशल मीडियावर माहिती देताना म्हटले आहे की, हरियाातील भूना शहरात (फतेहाबाद) पंजाब सरकारने आपली जमीन विक्री केली होती, त्याच्या रजिस्ट्रेशनचे काम गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होते. ते पूर्ण झाल्याने आता जमीन विक्रीतून जे पैसे येतील, ते ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केले जातील.
भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकरी संघटनेचे मुख्य मनजीत सिंह राय यांनी सांगितले की, हरियाणातील नोंदणीसाठी सरकारने पंजाबमधील शेतकरी नेत्यांची समिती स्थापन केली होती. समितीमध्ये भारतीय किसान युनियन दोआबाचे ज्येष्ठ नेते किरपाल सिंह मुसापूर, हरप्रीत सिंह सलारपूर, बलजीत सिंह हरदासपूर, मेजर सिंह अठोली, मनजीत सिंह लल्लिया आणि संतोख सिंह लखपूर यांचा समावेश होता. समितीने जमिनीच्या नोंदणीचे काम केले आहे. फगवाडामध्ये शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन यशस्वी झाले आहे.