एफआरपीप्रश्नी कारखान्यांना कारवाईचा फास आवळला

 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

पुणे चीनी मंडी

राज्यातील ८० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा केलेल्या १२५ साखर कारखान्यांभोवती कारवाईचा फास आणखी आवळण्यात आला आहे. साखर आयुक्तालयाने यापूर्वी नोटिस काढली होती. पण, आता येत्या १२ मार्च रोजी पुण्यात साखर आयुक्तालयात कारखान्यांची एका पाठोपाठ एक सुनवाणी होणार आहे. त्यामुळे या कारखान्यांच्या व्यवस्थापनांचे धाबे दणाणले आहेत.

महाराष्ट्रात आता साखर हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. पण, थकबाकीचा आकडा अजूनही मोठाच आहे. अनेक साखर कारखान्यांनी एफआरपी देता येत नाही, असे सांगत साखर नियंत्रण कायद्याचा आधार घेतला आहे. राज्यातील जवळपास २८ साखर कारखान्यांनी कायद्याचा आधार घेत शेतकऱ्यांशी टप्प्या टप्प्याने एफआरपी देण्याचा करार केला आहे. एफआरपी थकीत आहे. त्यामुळे हंगाम सुरू असतानाच सुनावण्या घेऊन शेतकऱ्यांना एफआरपीचे पैसे मिळतील, यासाठी साखर आयुक्तालयाकडून पावले उचलली जात आहेत. त्यामुळेच येत्या १२ मार्च रोजी १२५ साखर कारखान्यांच्या सुनावण्या घेण्यात येणार आहेत.

थकीत एफआरपी किती?

राज्यात यंदा १९३ साखर कारखान्यांमध्ये गाळप सुरू होते. त्यापैकी केवळ २३ कारखान्यांनीच शेतकऱ्यांच्या खात्यावर एफआरपीची पूर्ण रक्कम जमा केली आहे. त्यामुळे उर्वरीत साखर कारखान्यांपैकी ८० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी दिलेल्या कारखान्यांच्या सुनावण्या घेण्यात येत आहेत. राज्यात फेब्रुवारी अखेर एकूण एफआरपीचा आकडा १७ हजार ८१४ कोटी रुपये होती. त्यापैकी कारखान्यांनी १२ हजार ९४९ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा केले आहेत. त्यामुळे आता शिल्लक एफआरपी ४ हजार ८६४ कोटी रुपयांच्या पुढे असल्याची माहिती आहे.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here