अबुजा : राष्ट्रपती मुहम्मदु बुहारी यांनी साखर-गोड पेय पदार्थांवर (SSB) N १० प्रती लिटर टॅक्सला मंजुरी दिल्याच्या नऊ महिन्यानंतर National Action on Sugar Reduction (NASR) ने हा टॅक्स N ३० प्रती लिटरपर्यंत वाढवावा, अशी मागणी केली आहे.
NASR मध्ये नायजेरियाच्या ११ अशासकीय संघटनांचा समावेश आहे. एका गोलमेज परिषदेच्या अखेरीस जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, त्यांनी म्हटले आहे की, साखर-गोड पदार्थ, शीत पेयांच्या (एसएसबी) सेवनाने आरोग्य विषयक आव्हानांना तोंड देण्यासाठी धोरणात्मक उपायांतर्गत साखर टॅक्समध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात येत आहे.
जगातील अनेक देशांमध्येही अशाच प्रकारची मागणी करण्यात आली आहे. मात्र, त्याचा खास परिणाम दिसून आलेला नाही. उलट देशातील साखर उद्योगाचे यातून नुकसान झाले आहे.