पुढील हंगामासाठी निर्यात धोरण जाहीर करण्याची साखर कारखान्यांची मागणी

महाराष्ट्रातील साखर कारखानदारांची संघटना असलेल्या West Indian Sugar Mills Association (Wisma) ने एक ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आगामी गळीत हंगामासाठी निर्यात धोरण जाहीर करावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.

याबाबत अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियूष गोयल यांना लिहिलेल्या पत्रात Wisma ने म्हटले आहे की, सप्टेंबरमध्ये २०२२-२३ साठीच्या साखर निर्यात धोरणाची घोषणा केल्यास रखान्यांना पुढील करार करणे शक्य होईल. तसेच देशांतर्गत बाजारपेठेत जादा साखर विक्री करण्यापासून बचाव केला जावू शकते.

Wisma च्या म्हणण्यानुसार, आगामी हंगामातही उच्चांकी साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती सध्या भारतीय कच्ची आणि सफेद साखरेसाठी खूप अनुकूल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here