उत्तर प्रदेश: शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी १९२ कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा

खनौ : योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश कॅबिनेटने मंगळवारी झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी दिली. विविध प्रकारच्या आव्हानांचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांना अत्यावश्यक मदत देण्यासाठी १९२.५ कोटी रुपयांच्या मदतीला मंजुरी देण्यात आली. या मदतीचा उपयोग पुढील पाच वर्षे तण नियंत्रणासाठी तसेच विविध पर्यावरणीय संसाधनांचा वापर करून शेतात उभ्या आणि तयार पिकांची सुरक्षित साठवणूक करण्यासाठी केला जाणार आहे. कृषी संरक्षण युनिटच्या अनुदानावर शेतकऱ्यांना रासायनिक व सेंद्रिय कीटकनाशके दिली जातील.

पिकांच्या सुरक्षित साठवणुकीच्या अनुषंगाने साठवण युनिटसाठी ५० टक्के अनुदान देण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी किड, किटक, असुरक्षित साठवणूक, उंदरांचा त्रास आदी कारणांमुळे पिकांच्या नुकसानीला सामोरे जावे लागते. कॅबिनेटने शेतकऱ्यांचे नुकसान कमी करण्यासाठी २०२२-२३ पासून २०२६-२७ पर्यंत पाच वर्षासाठी १९२.५७ कोटी रुपयांच्या मदतीला मंजुरी दिली आहे. सरकार चालू आर्थिक वर्षात शेतकऱ्यांसाठी ३४.१७ कोटी रुपये खर्च करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here