बुलंदशहर : जिल्ह्यात यावेळी चांगला पाऊस झाला नसल्याने जवळपास ४५ टक्के ऊस पिक हुमणी या कि़डीच्या विळख्यात आले आहे. यामुळे पिकाचे ७० टक्के नुकसान होण्याची शक्यता आहे. गुलावठी आणि सिकंदराबाद येथे याचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. या पिकाला किडीपासून वाचविण्यासाठी केव्हीके आणि गाजियाबादच्या फार्मर संस्थेने सुरुवात केली आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या संशोधक डॉ. रिशु सिंह यांनी सांगितले की, यावेळी पाऊस कमी पडल्याने मक्का आणि ज्वारी पिकावर हुमणी किडीचा फैलाव झाला आहे. जिल्हाभर ही किडी पसरली आहे. जिल्ह्यात गुलावठी आणि सिकंदराबाद येथील ऊस पिकावर याचा जादा परिणाम झाला आहे असे दिसून आले आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मातीमध्ये ही किड अधिक पसरते. अळी एकाचवेळी हजारो अंडी देत असल्याने त्याची वाढ झपाट्याने होते. हे पिक वाचविण्यासाठी कोणतेही औषध उपयुक्त ठरत नाही. शेतकरी औषध फवारणी करतात. मात्र कीड तात्पुरती जमिनीखाली जाते. नंतर पुन्हा ती पुन्हा वर येवू शकते. शेतकरी जैविक पद्धतीने याचे नियंत्रण करू शकतात. त्याची पावडर जर फवारली तर किडे आजारी पडतात. पिक वाचविण्यासाठी केव्हीकेने गाझियाबादच्या फार्मर संस्थेसोबत काम सुरू केले आहे.