महागाईला आळा घालण्यासाठी समन्वय हवा, अर्थमंत्र्यांचा आरबीआयला सल्ला

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने महागाईला आळा घालण्यासाठी ट्रेझरी पॉलिसी आणि इतर घटकांशी समन्वय राखला पाहिजे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले. आर्थिक थिंक टँक इक्रीयरच्यावतीने आयोजित एका कार्यक्रमात सीतारमण म्हणाल्या की, चलनवाढीचे व्यवस्थापन केवळ चलनविषयक धोरणांतून पूर्ण केले जावू शकत नाही. असे प्रयोग इतर अनेक देशांमध्ये कुचकामी ठरले आहेत. आरबीआयला अनेक बाबतीत ताळमेळ घालावा लागेल. मात्र हा ताळमेळ पाश्चिमात्य देशांमध्ये जेवढा आहे, त्या प्रमाणात नसेल. मी आरबीआयला काही सांगू इच्छित नाही. मी काही निर्देश देत नाही. मात्र, भारताची अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी वित्तीय धोरणावरही काम करावे लागेल, हे वास्तव आहे.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, अर्थमंत्री म्हणाल्या की, जगात अशा अनेक अर्थव्यवस्था आहेत की, जेथे अशा प्रकारची धोरणे तयार केली गेली आहेत. चलनवाढ विषयक धोरण आणि व्याज दर व्यवस्थापन हे महागाई रोखण्यासाठीचे एकमात्र प्रभावी साधन आहे. या कार्यक्रमावेळी अर्थमंत्र्यांनी सांगितले की, रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाचा मी आदर करते. रशियाकडून कच्चे तेल घेणे हा निर्णय योग्य ठरला. रशिया आपल्याला सवलतीच्या दरात तेल द्यायला तयार आहे. रशियाकडून तेल आयातीचे आधीचे प्रमाण २ टक्के होते. ते आता १२ ते १३ टक्क्यांवर गेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here