महाराष्ट्रात गुरुवारी पावसाने पुन्हा एकदा लोकांची चिंता वाढवली. मुंबई हवामान केंद्राने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबादमध्ये जोरदार विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस कोसळेल. याशिवाय अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गढचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळमध्येही हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, पावसासह राज्यभरात ठिकठिकाणी ३० ते ४० किलोमीटर प्रती तास वेगाने वारे वाहतील. या अनुमाननंतर हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. विभागाने विविध जिल्ह्यंमध्ये पावसाची शक्यता गृहित धरून ११ सप्टेंबरपर्यंत अलर्ट जारी केला आहे. यापूर्वी बुधवारीही महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचे सत्र सुरुच राहिले. खासगी हवामान एजन्सी स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या खाडीत मध्यभागी चक्राकार हवेच्या कमी दाब क्षेत्रामुळे जोरदार पाऊस कोसळू शकतो. दुसरीकडे महाराष्ट्राचा वायू गुणवत्ता सूचकांक चांगला ते समाधानकारक या श्रेणीत दिसून आला आहे.