नवी दिल्ली : केंद्र सरकार इथेनॉलचा दर वाढविण्यावर विचार करीत आहे. इथेनॉलची किंमत वाढण्याच्या शक्यतेमुळे गुरुवारी शेअर बाजारात शुगर सेक्टरमधील शेअर्सनी उसळी घेतल्याचे दिसून आले. ११.२० वाजता सिंभावली शुगर्स, धरणी शुगर, बलरामपूर साखर कारखाना, उत्तम शुगर मिल आणि धामपूर शुगरचे शेअर १-५ टक्क्यांनी वाढून ट्रेड करीत होते.
Chinimandi.com ने ७ सप्टेंबर रोजी सांगितले होते की, केंद्र सरकारकडून आगामी हंगाम २०२२-२३ साठी साखर उत्पादकांकडून इंधन वितरण कंपन्यांना विक्री केल्या जाणाऱ्या इथेनॉलच्या किमतीत २-३ रुपये प्रती लिटरची वाढ केली जावू शकते.
सरकार इंधनामध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण सध्या १० टक्क्यांवरुन वाढवून १२ टक्के करण्याचा विचार करीत आहे. इंधनात २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे प्रयत्न म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात आहे.