हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
नवी दिल्ली : चीनी मंडी
साखर उद्योग सावरण्यासाठी सरकारने टाकलेली आश्वासक पावले आणि बाजारातून त्याला मिळत असलेली सकारात्मक साथ यांमुळे साखर उद्योग सध्या एका गोड वळणावर आला आहे, असे मत साखर उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
सरकारच्या निर्णयांविषयी स्टुअर्ट अँड मॅकेरटिच वेल्थ मॅनेजमेंटचे अॅनालिस्ट अभिषेक रॉय म्हणाले, ‘भविष्यात साखर उत्पादन घसरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे सरकारने निर्यात अनुदान देण्यास सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दरही वाढू लागले आहेत आणि कारखाने एका बाजुला साखरे ऐवजी इथेनॉल उत्पादनावर लक्ष केंद्रीत करत आहेत. या सगळ्याच सकारात्मक परिणाम साखर उद्योगावर होताना दिसत आहे. साखर उद्योग एका गोड वळणारवर आहे. गेल्या काही वर्षांपासून अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला बाहेर पडण्याची संधी यातून दिसत आहे. त्यामुळेच हळू हळू येणाऱ्या कॅश फ्लोच्या माध्यमातून साखर उद्योगात मालमत्ता उभ्या करण्याला प्राधान्य दिले जात आहे.’
देशातील महत्त्वाच्या बलरामपूर चीनी, बन्नारी अम्मन, धामपूर शुगर, दालमिया भारत, बजाज हिंदुस्तान या कंपन्यांच्या मुल्यामध्ये गेल्या आठवडाभरात वाढ झाल्याचे दिसत आहे. साखर उद्योगात हळू हळू येत असलेल्या पैशांमुळे हा उद्योग गेल्या काही महिन्यांतील अस्थिरतेमधून बाहेर पडत असल्याचे दिसत आहे.
सरकारने किमान विक्री दरात दोन रुपयांनी वाढ करून ३१ रुपये प्रति किलो केला आहे. यामुळे साखर कारखान्यांना खूप मोठा दिलासा मिळाला कारण, त्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देणी भागवण्याचा खूप मोठा भार यातून हलका झाला आहे. यासंदर्भात इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चचे कौस्तुभ लाखोटिया म्हणाले, ‘साखरेचा किमान विक्री दर वाढवल्यामुळे देशातील बाजारात होलसेल साखरेचे दर ३३ ते ३४ रुपयांनी वाढले. त्याचा निश्चित कारखान्यांना लाभ होत आहे.’
जेएम फायनान्शिअलचे अॅनालिस्ट अचल लोहाडे म्हणाले, ‘भारतातील बलरामपूर चीनी हा साखर कारखाना सर्वाधिक गाळप क्षमता असलेल्या कारखान्यांपैकी एक आहे. कारखान्याकडे रोज ७६ हजार ६०० टन ऊस गाळप करण्याची क्षमता आहे. साखरेचा किमान विक्री दर वाढवल्याचा सर्वाधिक फायदा या साखर कारखान्याला होणार आहे.’
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp