रोहाना, टिकोला कारखान्याची वाढणार गाळप क्षमता, अप्पर आयुक्तांकडून पाहणी

मुजफ्फरनगर : नव्या गळीत हंगामात जिल्ह्यातील रोहाना आणि टिकोला साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळेल. अप्पर ऊस आयुक्त व्ही. के. शुक्ल यांनी विभागाच्या पथकांसह दोन्ही साखर कारखान्यांच्या विस्तारीकरणाच्या कामाची पाहणी केली. कारखाना व्यवस्थापकांना यातील इतर कामे गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश दिले.

आयपीएल समुहाचा रोहाना कला साखर कारखाना व टिकोला साखर कारखाना गळीत हंगामाच्या आधी विस्तारीकरण करीत आहे. अप्पर ऊस आयुक्तांसह तांत्रिक पथकात उत्तर प्रदेश सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक (तांत्रिक) संदीप कुमार, उप मुख्य इंजिनीअर जॉय रॉय, कानपूरच्या राष्ट्रीय शुगर इन्स्टिट्यूटचे असिस्टंट प्रोफेसर संजय चौहान उपस्थित होते. पाहणी वेळी सहारनपूरचे ऊस उपायुक्त डॉ. दिनेश्वर मिश्र आणि जिल्हा ऊस अधिकारी डॉ. आर. डी. द्विवेदी यांनी सांगितले की, रोहाना कला कारखान्याची गाळप क्षमता २२०० टीसीडीवरून वाढवून २५०० टीसीडी केली जाणार आहे. तर टिकौला कारखान्याची क्षमता ९००० टीसीडीवरून वाढवून १२,००० टीसीडी केली जाईल. कारखान्याकडून केन कॅरिअरसह बॉयलिंग हाऊस, पॉवर हाऊस आदी ठिकाणी नवीन मशीनरी बसवली जात आहे. यावेळी अप्पर ऊस आयुक्तांनी संशोधन केंद्र, फार्म लॅबची पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here