ऊसाचे कोसी ०२३८ वाण बदलण्याची तयारी सुरू

हापुड : गेल्या पाच वर्षांपर्यंत बंपर उत्पादन देऊन शेतकऱ्यांची पसंती मिळवलेले उसाचे कोसी ०२३८ वाण बदलण्याची तयारी सुरू झाली आहे. या वर्षी शेतकऱ्यांनी ४१ हजार हेक्टरमध्ये या प्रजातीच्या उसाचे उत्पादन घेतले आहे. मात्र, रोगामुळे साधारणतः ३० ते ३५ टक्के उत्पादन घटण्याची शक्यता आहे. कृषी विज्ञान केंद्राने दोन नव्या प्रजातींचा प्रस्ताव ठेवला आहे. लखनौ आणि शाहजहांपूरच्या दोन वाणांच्या उसाची लागण ऊस विभागाच्यावतीने करण्यात आली आहे.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्ह्यात ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाते. पाच वर्षांपूर्वी कर्नालमधून कोसी ०२३८ प्रजाती हापूडमध्ये आणण्यात आली. त्याचे उत्पादन प्रती हेक्टर ९०० ते १००० क्विटंल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उसाची ही जात लोकप्रिय ठरली. उतारा चांगला असल्याने ०२३८ प्रजातीच्या उसाला शेतकऱ्यांनी आपलेसे केले. मात्र, यावर्षी हा ऊस रोगाच्या तडाख्यात सापडला आहे. अनेकवेळा औषध फवारणी करूनही यावर उपाय सापडलेला नाही. कृषी विज्ञान केंद्राच्या संशोधकांनी सर्व्हेत पिकाचे ३० ते ३५ टक्के नुकसान झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता हे वाण बदलून नव्या प्रजातीच्या उसाची लागवड केली जात आहे. यावर्षी जिल्ह्यातील उसाचे लागवड क्षेत्र २.१० टक्क्यांनी घतले आहे. कोसी ०२३८ ऐवजी सीओएलके १४२०१ आणि शहाजहांपूरच्या सीओएस १३२३५ या वाणांची लागवड केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here