पंजाब सरकारकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ७५ कोटींची थकबाकी अदा

चंदीगढ : सहकारी साखर कारखान्यांची ऊस थकबाकी अदा करताना उत्पादक शेतकऱ्यांना ७५ कोटी रुपये देण्यात आले आहे, असे पंजाब सरकारने म्हटले आहे.

मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले की, राज्य सरकारने बुधवारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ७५ कोटी रुपये जारी केले आहेत. त्यामुळे आता अजनाला, बटाला, बुधेवाल, भोगपूर, फाजिल्का, गुरदासपूर, मोरिंडा, नकोदर आणि नवांशहर आदी नऊ सहकारी साखर कारखान्यांकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कोणतीही थकबाकी नाही.

मुख्यमंत्री मान म्हणाले की, ही ऊस थकबाकी गळीत हंगाम २०२१-२२ यामधील आहे. आणि पहिल्यांदाच शेतकऱ्यांना सर्व पैसे मिळाले आहेत. ते म्हणाले की, आतापर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ६१९.६२ कोटी रुपयांची ऊस बिले मिळाली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here