तुकडा तांदूळ निर्यातीवर पूर्ण निर्बंध, सरकारकडून आदेश जारी

नवी दिल्ली : तादळाच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी भारत सरकारने तुकडा तांदळाच्या निर्यातीवर पूर्णपणे निर्बंध लागू केले आहेत. याबाबतचा आदेश जारी करण्यात आला असून तो आजपासूनच लागू होणार आहे. यापूर्वी तुकडा तांदूळ निर्यातीवर कोणत्याही प्रकारची शुल्क आकारणी केली जात नव्हती. याशिवाय, सरकारकडून जारी करण्यात आलेल्या अन्य एका आदेशात म्हटले आहे की बासमती वगळता इतर तांदळाच्या निर्यातीवर २० टक्के शुल्क वसुल केले जाईल. हा आदेशही आजपासून लागू होईल.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, बासमती तांदूळ निर्यात निर्बंधाच्या बाहेर ठेवण्यात आले आहेत. भारत चीननंतर तांदळाचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा उत्पादक देश आहे. जागतिक तांदूळ उत्पादनात भारताचा हिस्सा २० टक्के आहे. सरकारच्या एका अधिसूचनेत म्हटले आहे की सध्याच्या खरीप हंगामात भाताच्या लागवडीचे क्षेत्र खूप घटले आहे. अशात देशांतर्गत पुरवठा वाढविण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार काही राज्यांत खरीप हंगामात भाताचे क्षेत्र ५.६२ टक्क्यांनी घटून ३८३.९९ लाख हेक्टरवर आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here