मेरठ : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप गेल्या हंगामातील ऊस बिले मिळालेली नाहीत. याप्रश्नी रस्त्यावर उतरून आंदोलन करू. जर वेळेवर बिले दिली गेली नाहीत तर रालोद चक्का जाम करून शेतकऱ्यांच्या हिताची लढाई करेल असे पक्षाचे राष्ट्रीय महासचिव त्रिलोक त्यागी यांनी सांगितले. चेंबर ऑफ कॉमर्समध्ये झालेल्या रालोद कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यागी म्हणाले की, शेतकऱ्यांचे हक्काचे, ऊसाचे पैसे अद्याप त्यांना मिळालेले नाहीत. साखर कारखानदार पैसे देण्यास तयार नाहीत. जर वेळेवर पैसे मिळाले नाहीत, तर रालोदच्यावतीने चक्का जाम आंदोलन केले जाईल. शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी रालोद सक्रीय राहील असे त्यागी यांनी सांगितले. संमेलनात माजी आमदार विनोद कुमार हरित, माजी विभाग अध्यक्ष चौधरी यशवीर सिंह, प्रदेशाध्यक्ष संगीता दोहरे, मतलूब गौड, रामवीर सिंह गुर्जर, सुनील रोहटा, नरेंद्र खजूरी, अनीस कुरेशी, मनदीप सिंह बिंद्रा आदी यावेळी उपस्थित होते.