लवकर पैसे देणाऱ्या कारखान्यांना जादा ऊस खरेदी केंद्रे देण्याचा प्रस्ताव

मेरठ : सरधना येथील ऊस भवनात आगामी गळीत हंगामाबाबत शेतकरी संघर्ष समितीची बैठक झाली. यावेळी ऊस खरेदी केंद्रांच्या वाटपाबाबत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. समितीचे अध्यक्ष विजेंद्र सिंह यांनी सांगितले की, जे साखर कारखाने ऊस बिले देण्यात पिछाडीवर आहेत, त्यांचे ऊस क्षेत्र कमी करून शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देणाऱ्या कारखान्यांना देण्याचे ठरले. पांडवनगरातील ऊस भवानात विविध गावांतून आलेल्या शेतकरी प्रतिनिधींनी आगामी गळीत हंगामासाठी नव्या ऊस खरेदी केंद्रांच्या वितरणाबाबत चर्चा केली. यावेळी ऊस थकबाकीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.

भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पुरखास अरनावली, सलाहपूर, कुराली, किठौली, चोबला, जानी कला, बहरामपूर मोरना येथील शेतकऱ्यांनी सिंभावली व किनोनी साखर कारखान्याच्या ऊस केद्रांमध्ये कपात करून खतौली अथवा टिकोला साखर कारखान्याकडे ती द्यावीत अशी मागणी केली. शेतकऱ्यांनी सांगितले की, कारखाने अखेरच्या पंधरवड्यात तोडणी पावत्या देतात. मात्र, कमी कालावधीत ऊस पाठवणे शक्य होत नाही. परिणामी शेतकऱ्यांना ऊस गुऱ्हाळांना द्यावा लागतो. त्यामुळे हा ऊस इतर कारखान्यांना द्यावा, असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here