शामली : राष्ट्रीय शेतकरी कामगार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आगामी गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या उसाला ४५० रुपये प्रती क्विंटल दर जाहीर करण्याची मागणी केली आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष व्ही. एम. सिंह यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन उप जिल्हाधिकारी संतोष कुमार सिंह यांना दिले.
लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, संघटनेचे जिल्हाध्यक्षांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या काही भागात कमी पावसाअभावी दुष्काळाची स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना, उसासाठी सिंचन सुविधा, किटकनाशकांची फवारणी करून किड, रोगांना आळा घालणे यासाठी जादा खर्च करावा लागत आहे. डिझेलवरील खर्च अधिक झाल्याने अनुदानाची तरतुद करण्याची गरज आहे. गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये ऊसाचा दर ४५० रुपये प्रती क्विंटल जाहीर करावा आणि शेतकऱ्यांची ऊस थकबाकी व्याजासह देण्याची तरतुद करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.