साओ पाउलो : ब्राझील कडून यंदा युरोपमध्ये इथेनॉलची उच्चांकी निर्यात केली जाण्याची शक्यता एसअँडपी ग्लोबल कमोडिटी इनसाइट्सने आपल्या अहवालात व्यक्त केली आहे. देशांतर्गत बाजारपेठेच्या तुलनेत विदेशी बाजारातील आकर्षक स्थितीमुळे हा बदल झाला आहे. ऑगस्टच्या मध्यापर्यंत ब्राझीलने युरोपमध्ये जवळपास ४२७ मिलियन लिटर इथेनॉल पाठविल्याचे रॉयटर्सच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
२०२१ मधील याच कालावधीच्या तुलनेत इथेनॉल निर्यातीचे हे प्रमाण ४३५ टक्के अधिक आहे. २०२२ च्या अखेरपर्यंत ब्राझील युरोपमध्ये ६०० मिलियन लिटर जैव इंधनाची निर्यात करेल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. जैवइंधनाच्या ब्राझीलमधील कमी किंमती आणि युरोपातील वाढती मागणी यामुळे निर्यातीने गती घेतली आहे. आगामी काळातही अशीच स्थिती राहील असे अनुमान एसअँडपी ग्लोबल कमोडिटी इनसाइट्ने व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसा जर्मनी, युके, स्वीडनसारख्या प्रमुख ग्राहक देशांमध्ये स्वस्त ई १० इंधनाची (पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉलचे मिश्रण) मागणी सातत्याने वाढत आहे.