ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीसाठी चंपारणमध्ये रॅली

वैकुंठपूर : जिल्ह्यात शरद ऋतुच्या काळात, आडसाली ऊस लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी, सलग चौथ्या दिवशीही जनजागृती रॅली काढण्यात आली. सिधवलीया साखर कारखान्यापासून सुरू झालेली ही रॅली डुमरियाघाट पुलावरून चंपारणच्या दिशेने रवाना झाली.

लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्ह्यात शरद ऋतुच्या काळात ऊस लागवड व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून काढण्यात आलेल्या बाईक रॅलीतून साखर कारखान्याच्या ऊस विभागाचे अधिकारी, कर्मचारी नियोजित रुटनुसार पूर्व चंपारण जिल्ह्यातील अनेक विभागात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करीत आहेत. सकाळी आठ वाजता कारखाना परिसरातून रॅली काढण्यात आली. रॅली राजपूर, दुबौली, फुलवरिया, गोपीगंज, बिश्रामपूर, रामपूर, खजुरिया, सरेया, पांडेय टोला, चांदपूर, सिकंदरपूर, जलहा, भवानीपूर, शेरपूर, नया टोला, बेनीपूर, मंगलपूर, सारनपूर, केसरिया, पकडी, साहेबगंज, माधोपूर हजारी शेमराहा, भोपतपूरसह ४५ गावांमध्ये फिरली. यामध्ये ठिकठिकाणी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here