फाजिल्का : फाजिल्का सहकारी साखर कारखान्याच्या ऊस विभागाच्या वतीने गावागावात जावून शेतकऱ्यांमध्ये ऊस लागवडीविषयी जनजागृती केली जात आहे. यासाठी बैठका घेण्यात येत आहेत. या अंतर्गत हिरावली गावातील शेतकऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, साखर कारखान्याच्या ऊस विभागाचे प्रमुख पृथ्वी राज यांनी सांगितले की, पंजाबमध्ये सध्या सरकारकडून ऊस उत्पादकांची यापूर्वीची सर्व थकबाकी अदा करण्यात आली आहे. भविष्यातही साखर कारखान्याकडून ऊस बिले वेळेवर दिली जातील. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकाधिक ऊस लागवड करावी. बैठकीत कारखान्याच्या या आवाहनाला शेतकऱ्यांनी होकार दिला. अधिकाधिक ऊस लागवड केली जाईल, असे त्यांनी सांगितले. कारखानदारांना कोणतीही अडचण येवू दिली जाणार नाही असे आश्वासन देण्यात आले. कारखान्याचे उपाध्यक्ष विक्रमजीत झिंझा आणि सर्वेअर बलविंदर सिंह संधु उपस्थित होते.