कोइंबतूर : ऊस शेतीच्या यांत्रिकीकरणामुळे उत्पादक शेतकऱ्यांना फायदाच होईल असे प्रतिपादन आयसीएआर ऊस संस्था, कोइंबतूरच्या संचालक जी. हेमप्रभा यांनी केले.
दोन दिवसीय केनफेस्ट २०२२ या प्रदर्शनात मार्गदर्शन करताना हेमप्रभा यांनी सांगितले की, तामिळनाडूमध्ये प्रती हेक्टर ऊस उत्पादन खर्च २ लाख रुपये आहे. आणि हा खर्च देशात सर्वाधिक आहे. तोडणीसाठी लागणाऱ्या मनुष्यबळामुळे शेतकऱ्यांना खूप कमी नफा मिळतो. शेतकऱ्यांना प्रती टन ८०० ते ९०० रुपये ऊस तोडणीसाठी खर्च करावे लागतात. तर उसाला प्रती टन ३००० रुपये दर मिळतो. त्यामुळे या कामाचे यांत्रिकीकरण शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे.
केनफेस्ट २०२२ मध्ये ५० स्टॉल लावण्यात आले आहेत. यापूर्वी एक्स्पोचे उद्घाटन तामिळनाडू कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू व्ही. गीतालक्ष्मी यांच्या हस्ते करण्यात आले.