साखर कारखान्याचे ऊस खरेदी केंद्र बदलण्याची मागणी

बागपत : भडल गावात झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी भैसाना साखर कारखान्याचे ऊस खरेदी केंद्र बदलण्याची मागणी केली. याठिकाणी कारखान्याला दुसरे केंद्र लावू दिले जाणार नसल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. चौगामा विभागात शेकडो शेतकरी भैसाना कारखान्याला ऊस पाठवतात. मात्र, वेळेवर बिले मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कारखान्याने नव्या गळीत हंगामासाठी तयारी सुरू केली असली तरी जुनी बिले मिळालेली नाहीत. याबाबत शेतकऱ्यांनी आंदोलन करूनही तोडगा निघाला नाही.

याबाबत अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस विकास समिती बुढानाच्या सर्वसाधारण बैठकीत निरपुडा, गैडबरा, दाहा, इदरीशपूर, धनोरा येथील शेकडो शेतकऱ्यांनी भैसाना कारखान्याची ऊस खरेदी केंद्रे काढून तेथे दुसऱ्या कारखान्यांची केंद्रे मंजूर करावी अशी मागणी केली होती. मात्र, यावर अद्याप निर्णय झालेला नाही. शेतकऱ्यांनी ही केंद्रे तत्काळ हटवावीत अशी मागणी केली. बिजेंद्र राणा, महक सिंह, राजबीर, अशोक, सहाब सिंह, रामपाल, जयपाल, यशपाल आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here