सलग तिसऱ्या सत्रामध्ये रुपयाची घसरण, सर्वसामान्यांवर परिणाम शक्य

नवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात घसरण होण्याचे सत्र सुरुच आहे. सोमवारी भारतीय शेअर बाजारात सुरुवातीला डॉलरच्या तुलनेत रुपया ४३ पैशांनी घसरून ८१.५२ च्या स्तरावर पोहोचला. रुपयाचा डॉलरच्या तुलनेत हा निच्चांकी स्तर आहे. जागतिक स्तरावरील अस्थिरतेमुळे डॉलर मजबूत होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. डॉलरच्या मजबुतीची नोंद करणारा डॉलर इंडेक्स गेल्या २० वर्षांतील उच्चांकी स्तरावर, ११३.९० च्या आसपास आहे. जगभरातील चलनांमध्ये घसरण सुरू आहे. ब्रिटिश पाउंड, युरो सुद्धा अनेक दशकांच्या किमान स्तरावर पोहोचला आहे.

जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार डॉलरच्या मजबुतीमागे अमेरिकेतील व्याज दर वाढ कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे अमेरिकन गुंतवणुकदारांनी जगभरातील पैसे काढून आपल्या देशात गुंतवणूक सुरू केली आहे. अशात २८-३० सप्टेंबर यांदरम्यान होणाऱ्या पतधोरण समितीच्या बैठकीत आरबीआयकडून व्याजदर वाढीची घोषणा होवू शकते. परिणामी कर्जदारांना मोठा फटका बसेल. रुपयाच्या घसरणीने आयात महागणार आहे. कच्चे तेल, मोबाईल, कंझ्युमर ड्युरेबल्स महाग होतील. याशिवाय परदेश दौरा करणाऱ्यांनाही या महागाईची झळ बसू शकेल. परदेशात शिक्षण आणि उपचार महागणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here