परदेशी व्यापार धोरणाची मर्यादा सहा महिने वाढवली

सरकारला निर्यात प्रोत्साहन परिषद आणि आघाडीच्या निर्यातदारांकडून, सध्याचे परदेशी व्यापार धोरण (2015-20) चालू ठेवण्याची परवानगी देण्याबाबत विनंत्या प्राप्त झाल्या आहेत.  या धोरणाची मुदत वेळोवेळी वाढवण्यात आली आहे.

अलीकडच्या काळात निर्यातदार आणि उद्योग संघटनांनी  सरकारला जोरदार आग्रह केला आहे की सध्याच्या अस्थिर जागतिक आर्थिक आणि भू-राजकीय परिस्थितीत सरकारने सध्याचे धोरण आणखी काही काळ सुरु ठेवणे तसेच नवीन धोरण आणण्यापूर्वी अधिक सल्ला मसलत करणे उचित ठरेल.

सरकारने धोरण निर्मितीमध्ये सर्व भागधारकांना नेहमीच सहभागी केले आहे. हे लक्षात घेता, परदेशी व्यापार धोरण 2015-20 ची मुदत सप्टेंबर 30, 2022 रोजी संपत असून, ती ऑक्टोबर 1, 2022 पासून पुढील सहा महिने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here