चांगले ऊस उत्पादन घेणाऱ्या युवा शेतकऱ्यांचा होणार सन्मान

बिजनौर : युवा शेतकऱ्यांचा ऊस शेतीकडे कल वाढावा यासाठी त्यांना पुरस्कार देवून सन्मानित केले जाणार आहे. यासाठी शेतीमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्यांची निवड केली जाणार आहे. ऊस विभाग अशा शेतकऱ्यांची निवड तोडणीच्या आधारावर करेल. निवडक तीन शेतकऱ्यांना शासनाकडून पुरस्कार दिले जातील. बिजनौर हा साखर पट्टा मानला जातो. येथे जवळपास सव्वा दोन लाख हेक्टरवर ऊस लागवड केली जाते. ग्रामीण अर्थव्यवस्था या भोवतीने फिरते. मात्र, शेतीमधून उत्पन्न कमी मिळत असल्याने नवी पिढी त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. युवक शेतीऐवजी नोकरी करणे पसंद करतात. त्यामुळे ऊस विभागाने नव्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस विभागाकडून उत्कृष्ठ ऊस शेती पुरस्कारांसाठी तीस सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. विभागाकडून युवा शेतकऱ्यांचाही सन्मान होईल. याबाबत मागविलेले अर्ज मुख्यालयाला पाठवले जातील. यात घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेची माहिती वरीष्ठ स्तरावर दिली जाईल. याशिवाय, चांगला ऊस गाळप करणारा कारखाना, समित्या, ऊसाची रोपे बनविणारे महिलांचे गट यांचाही सन्मान केला जाणार असल्याचे जिल्हा ऊस अधिकारी पी. एन. सिंह यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here