कुंदुरुखी साखर कारखान्याकडे १२२ कोटींची ऊस बिल थकबाकी, खासदारांची नाराजी

गोंडा : ऊस गळीत हंगाम संपून सहा महिने झाल्यानंतरही कुंदुरुखी साखर कारखान्याकडे १२२ कोटी रुपयांची ऊस बिलांची थकबाकी आहे. ही थकीत बिले तातडीने दिली जावीत, असे निर्देश जिल्हा ऊस अधिकाऱ्यांना देण्यात आले. केंद्रीय योजनांबाबत जिल्हा विकास समितीच्या  जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित बैठकीत या सूचना देण्यात आल्या. कैसरगंजचे खासदार बृजभूषण शरण सिंह या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मनरेगा योजनांचा आढावा घेताना खासदारांनी पंचायत क्षेत्रातील कामे बंद पडल्याबद्दल खासदारांनी नाराजी व्यक्त केली. सरकारच्या निर्देशानुसार कामे केली जावेत अशी सूचना त्यांनी पंचायतींना केली. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत लवकरच बैठक घेवून समस्यांची सोडवणूक केली जाईल असे आश्वासन दिले. कुंदुरुखी कारखान्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात ऊस थकबाकी असल्याबद्दल खासदारांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत तातडीने ऊस बिले शेतकऱ्यांना मिळावीत याकडे लक्ष देण्याच्या सूचना जिल्हा ऊस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. कौशल्य विकास मिशनअंतर्गत सुविधांची तपासणी व रस्त्याकडेची अवैध बांधकामे याबाबतची काही निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here