साखर कारखान्याच्या गेटवर ऊस घेवून येणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सुविधांबाबत कारखान्याच्या यार्डमध्ये कुशल व्यवस्थापन करावे. तसेच तेथे मुलभूत सुविधांची पूर्तता करावी, असे निर्देश राज्याचे ऊस तथा साखर आयुक्त संजय भूसरेड्डी यांनी दिले आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी सजग असलेल्या साखर उद्योग तथा ऊस विकास विभागाचे मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील सर्व साखर कारखान्याचे व्यवस्थापक, विभागीय अधिकाऱ्यांना त्यांनी याबाबत सूचना केल्या आहेत.
याबाबत विस्तृत माहिती देताना आयुक्तांनी सांगितले की, साखर कारखान्यांच्यावतीने शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी प्रक्रिया कारखान्याच्या गेटवर, यार्डमध्ये तसेच ऊस खरेदी केंद्रांच्या माध्यमातून केली जाते. दररोज सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ही प्रक्रिया सुरू असते. शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी प्रक्रिया सोपी केली जावी असे निर्देश कारखान्यांच्या व्यवस्थापनाला देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना कमी कालावधी लागावा, ऊस खरेदी केंद्रावर तसेच बाहेर त्यांना प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागू नये यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
भुसरेड्डी यांनी सांगितले की, कारखान्यांच्या यार्डमध्ये मुलभूत सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. आदर्श यार्ड व्यवस्थापनाच्या रुपात प्रभावीपणे ही व्यवस्था राबवावी. आगामी गळीत हंगामात कारखान्यांनी यार्डमध्ये स्वच्छ पाण्याची उपलब्धता, शेतकऱ्यांना विश्रांतीसाठी कक्ष, बैठकीसाठी खुर्च्या ठेवाव्यात. कारखान्याने नियमित साफसफाई ठेवावी. तेथे विजेची योग्य व्यवस्था असावी. ऊस वाहतुकीवेळी रस्ते खड्डेमुक्त असावेत अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
विभागीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना या सुविधा दिल्या जात आहेत की नाहीत, याची अचानक भेटी देवून पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. जर अशा ठिकाणी काही कमतरता आढळल्यास कारखान्याने त्याची त्वरीत भरपाई करावी. पाहणी वेळी शेतकऱ्यांकडून अधिकाऱ्यांनी फिडबॅक नोंदवावा. शेतकऱ्यांना जर काही व्यावहारिक अडचणी येत असतील तर त्यांचे निराकरणही करण्यात यावे अशी आदेश देण्यात आले आहेत.