थकीत ऊस बिलांबाबत शेतकऱ्यांची निदर्शने

बरेली : साखर कारखान्यांच्याकडून थकीत ऊस बिले त्वरीत देण्यात यावी या मागणीसाठी भारतीय किसान युनियनच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी शेठ दामोदर स्वरुप पार्कमध्ये निदर्शने केली. कारखान्यांनी नियमानुसार व्याजासह ऊस बिले द्यावीत, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केली.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असल्याने सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली. भात आणि ऊस पिकाचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय आँवला येथील इफको कंपनीला जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांनी नोकरी देण्याचीही मागणी केली. बिसौली येथील शेतकऱ्यांनी तलावाच्या भाडेपट्टा कराराचे वितरण करताना घोटाळा करण्यात आल्याचा आरोप केला. याशिवाय, बिसौलीच्या उप जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणीही करण्यात आली. विभागातील चार जिल्ह्यांतील शेतकरी या आंदोलनात सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here