ESY२०२३ पर्यंत १२ टक्के मिश्रण उद्दिष्टपूर्ती ई २० वाहनांच्या लाँचिंगवर अवलंबून राहणार : ICRA

नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण वाढविल्याने भारताला अनेक लाभ होतील. यामध्ये आयातीच्या खर्चात कपात, CO2 उत्सर्जनमध्ये होणारी घट, अतिरिक्त साखर पुरवठ्याचे नियोजन करणे, अतिरिक्त गुंतवणूकीसह नोकरीच्या संधी निर्माण होणे, उद्योजकांसाठी उत्पादनातील विविधता, गतीने ऊस बिले शेतकऱ्यांना मिळणे याचा समावेश आहे. भारताने जून २०२२ मध्ये वेळेपूर्वी १० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट गाठले आहे. सद्यस्थितीत २८ ऑगस्ट २०२२ पर्यंत सरासरी इथेनॉल मिश्रण १०.०४ टक्के झाले आहे. मिश्रणाचे १४ राज्यांमधील प्रमाण सरासरीपेक्षा अधिक आहे. याशिवाय, OMCs नी ESY2022 साठी पूर्ण वर्षाच्या प्रमाणापेक्षा अधिक इथेनॉल खरेदी केली आहे. देशात साखरेपासून इथेनॉल उत्पादनाचा हिस्सा ८६ टक्के आणि आणि धान्यावर आधारित इथेनॉलचा हिस्सा १४ टक्के आहे.

ESY २०२५ पर्यंत मिश्रणासाठी ९८८ कोटी लिटर इथेनॉलची गरज भासेल असे अनुमान आहे. साखर आणि धान्याच्या माध्यमातून उत्पादीत इथेनॉलचे ESY २०२१ च्या स्तरापेक्षा हे प्रमाण तिप्पट असेल. इथेनॉल उत्पादनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कच्च्या मालाची पुरेशी उपलब्धता आणि धान्यावर आधारित डिस्टिलरीची क्षमता वाढविणे गरजेचे आहे. साखर कारखाने इथेनॉलची गरज भागविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. याशिवाय सरकारने आपल्या महत्त्वाकांक्षी योजनेद्वारे २०२५ पर्यंत (पूर्वीच्या २०३०) २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी साखर कारखान्यांसह विविध घटकांसाठी आपल्या योजनांची घोषणा केली आहे.

इथेनॉल उद्योगाच्या अनुषंगाने आपले विचार मांडताना आयसीआरए लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि समुह प्रमुख (कॉर्पोरेट रेटिंग) सब्यसाची मुजुमदार यांनी सांगितले की, मागणी आणि पुरवठ्याचे महत्त्वपू्र्ण प्रमाण, काही राज्य सरकारांची अनुकूल धोरणे पाहता खासगी घटकांना प्रोत्साहन दिले जात आहे. केवळ केएलपीडी १.३-१.६ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवर मोलॅसीस आणि धान्यावर आधारित डिस्टिलरीची क्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही गुंतवणूक सध्याच्या इथेनॉल मिळविण्यात, धान्यावर आधारित डिस्टिलरीसाठी १६-१९ टक्के ऑपरेटिंग मार्जिन मिळवू शकते. साखरेवर आधारित आसवनीसाठी महसूल, लाभ हे दुसऱ्या विभागांपेक्षा वेगळे असतात. कारण कृषी क्षेत्र, साखर उतारा, साखर उत्पादन, ऊस खरेदीसाठी गुंतवणूक या गोष्टी भिन्न आहेत.

आयसीआरए विश्लेषण सध्याच्या किमतीवर तीन पर्यायांपैकी (सी हेवी मोलॅसिस, बी हेवी मोलॅसीस आणि सिरप) सिरप आधारित इथेनॉलमधून उच्च महसूल आणि फायद्याच्या दिशेने इशारा करते. तर साखर कारखान्यांच्या खेळत्या भांडवलाच्या समस्येची तीव्रताही यातून कमी होते. चांगल्या अर्थशास्त्रानंतरही सीरपवर आधारित इथेनॉलचे उत्पादन केवळ गळीत हंगामादरम्यान केले जावू शकते. तर आसवनी निर्माता सिरपवर वर्षभर इथेनॉल उत्पादनाच्या तंत्रज्ञानाच्या दिशेने काम करीत आहेत. याशिवाय, ICRA च्या म्हणण्यानुसार, साखरेवर आधारित फिडस्टॉकपासून २० टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक इथेनॉलचे उत्पादन करण्यासाठी पुरेसा ऊस उपलब्ध आहे.

याशिवाय, काही ओएमसी भारत सरकारच्या आर्थिक सहाय्यतेअंतर्गत २ जी इथेनॉल क्षेत्रात गुंतवणूक करीत आहेत. मात्र, मोठ्या भांडवली खर्चाची आवश्यकता यात अडथळा ठरू शकते. त्यातून गुंतवणुकीत अधिक अडथळे निर्माण होतील. भारताने जून २०२२ मध्ये, निर्धारीत वेळेपूर्वी १० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट गाठले आहे. ESY2023 साठी १२ % मिश्रणाचे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी इथेनॉल उपलब्धतेशिवाय ई २० वाहनांचे वेळेवर लाँचिंग आणि त्यांचा स्वीकार कधी होतो, या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here