फिलिपाइन्स करणार साखर कारखान्यांचे आधुनिकीकरण

मनिला : देशातील साखर कारखान्यांचे आधुनिकीकरण करण्याचे आश्वासन फिलिपाइन्स शुगर मिलर्स असोसिएशन (PSMA) ने दिले आहे. पीएसएमएचे उप संचालक ऑस्कर कोर्टेस यांनी सांगितले की, देशातील साखर कारखान्यांना बदलत्या बाजारातील परिस्थितीला तोंड देताना कठीण परिस्थितीतून जावे लागत आहे. कोर्टेस यांनी सांगितले की, १९९०च्या दशकात सरकारी मालकीच्या सुविधांचे खासगीकरण आणि गुंतवणूक प्राधान्य योजनेमध्ये (आयपीपी) साखर कारखान्यांचा समावेश करून कारखान्यांच्या आधुनिकीकरणास गती देण्यात आली होती. ते म्हणाले की, नवी उत्पादन प्रणाली आणि व्यवस्थापनावर P २० बिलियनची गुंतवणूक करण्यात आली आहे.

कोर्टेस यांनी सांगितले की, साखर नियामक प्रशासन (एसआरए) कारखान्यांद्वारे स्थापन करण्यात आलेल्या नव्या उपकरणांचे ट्रॅकिंग करते. त्यांनी सांगितले की, ९० च्या दशकात जेव्हा आधुनिकीकरण कार्यक्रम सुरू करण्यात आला होता, तेव्हा त्यामध्ये ४१ कारखान्यांचा समावेश होता. त्यानंतर ज्या कारखान्यांनी अपग्रेडेशन केले नाही, त्यातील बहुतांश कारखान्यांचे काम बंद पडले आहे. सध्या २८ कारखाने सुरू आहेत. एसआरएद्वारे प्रकाशित औद्योगिक अहवालानुसार १९९० च्या दशकात साखर कारखान्यांचा डाऊनटाइम खूप कमी होता. ते म्हणाले की, अनेक कारखाने पी ६१.३६ बिलियन किमतीचे इथेनॉल उत्पादन आणि सह उत्पादन सुविधा सुरू करून साखर उत्पादनात आघाडीवर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here