कर्नाल: MHU मध्ये तयार होणार शेतकऱ्यांसाठी ड्रोन प्रशिक्षण केंद्र

कर्नाल : महाराणा प्रताप हॉर्टिकल्चर युनिव्हर्सिटी ((एमएचयू) शेतकरी, उद्योजक तसेच विद्यार्थ्यांना ड्रोनचे प्रशिक्षण देणार आहे. युनिव्हर्सिटीकडून जिल्ह्यातील अंजंथली फार्मवर प्रशिक्षण केंद्र स्थापन केले जाणार आहे. एमएचयूचे कुलगुरू डॉ. समर सिंह यांनी सांगितले की, नोव्हेंबरच्या अखेरीस केंद्र सुरू होईल अशी अपेक्षा आहे. विद्यार्थी, शेतकरी आणि उद्योगपतींसाठी एक आठवड्याचे प्रशिक्षण उपलब्ध असेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना ड्रोन चालविण्यासाठीचा परवाना दिला जाईल. एमएचयू अशा प्रकारचे प्रशिक्षण आणि लायसन्स जारी करणारे राज्यातील सरकारी क्षेत्रातील पहिले विद्यापीठ आहे, असा दावा त्यांनी केला. ते म्हणाले की, सरकारी निर्देशानुसार ड्रोन चालविण्यासाठी परवान्याची आवश्यकता असते. आमची संस्था पूर्ण विभागात इतर खासगी संस्थांच्या तुलनेत कमी शुल्कावर प्रशिक्षण देणार आहे.

याशिवाय, एमएचयू सहा महिने शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये ड्रोन स्प्रेचे २५० प्रयोग करणार आहे. त्यासाठी दोन ड्रोनची खरेदी करण्यात आलेली आहे. तज्ज्ञ आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत त्याचे लाँचिंग करण्यात आले. शेतकऱ्यांना ड्रोन स्प्रेचे प्रदर्शन दाखविण्यात आले. ड्रोनद्वारे फवारणी हे एक नवे तंत्र आहे. आणि यातून केवळ वेळेची नव्हे तर मनुष्यबळाचीही बचत केली जाते. मनुष्यबळाद्वारे फवारणीच्या तुलनेत स्प्रे द्वारे फवारणी अधिक परिणामकारक आहे. कुलगुरू डॉ. समर सिंह यांनी सांगितले की, ऊस पिक तसेच इतर उंच पिकांवर ड्रोनद्वारे फवारणी अधिक प्रभावी आहे. तर माणसांद्वारे अशी फवारणी ही अधिक कठीण असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here