चीनमधील दुष्काळामुळे अन्न आणि ऊर्जा सुरक्षेला धोका

बिजिंग : चीनमधील १७ हून अधिक प्रांतामध्ये ९०० मिलियनपेक्षा अधिक लोकांना, तसेच २.२ मिलियन हेक्टर शेत जमिनींना उच्चांकी तापमानाचा फटका बसला आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम देशाच्या अन्न आणि ऊर्जा सुरक्षेवर झाला आहे. जस्टअर्थ न्युजच्या अहवालानुसार, चीनमधील सर्वात मोठा पोयांग तलाव आणि यांग्त्जी नदी खोऱ्यासह (वायआरबी) इतर विभागातही पाण्याच्या स्तरात घसरण झाली आहे. त्यामुळे चीनमध्ये पाणी आणि अन्न सुरक्षेसोबतच जलविद्युत उत्पादनात मोठी घट झाली. आणि आगामी काळात विजेच्या तुटवड्याबाबत चिंता वाढली आहे. जस्टअर्थ न्युजच्या अहवालानुसार, तीव्र उष्ण हवामानामुळे दुष्काळ पडला आहे आणि दिवसेंदिवस ही स्थिती भीषण बनत चालली आहे. अलिकेडील महिन्यात चीनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देशातील अन्न सुरक्षेच्या रणनीतीच्या महत्त्वाबाबत अनेकवेळा भर दिला आहे.

जस्टअर्थ न्युजच्या अहवालानुसार राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी अन्न सुरक्षेला सार्वजनिक रुपात चीनच्या राष्ट्रीय सुरक्षेशी जोडून अन्न सुरक्षा आणि शेतांमधून वाढत्या देशांतर्गत उत्पादनाला वाचविण्यासाठी कार्यवाही करण्याचे आवाहन केले आहे. जस्टअर्थ न्युजच्या अहवालानुसार, सिचुआनमध्ये ५० टक्के तलाव कोरडे पडले आहेत. त्याचा या विभागातील जलविद्युत उत्पादन आणि निर्यातीवर परिणाम झाला आहे. सिचुआन प्रांत आणि चोंगकिंगयासारख्या ठिकाणी विजेच्या तुटवड्यामुळे अनेक शहरांना देशाच्या इतर भागातून विज आयात करण्याची वेळ आली आहे. देशाच्या मालकीची सर्वात मोठी वीज कंपनी स्टेट ग्रिड कॉरपोरेशन ऑफ चायनाने तुटवडा कमी करण्यासाठी सिचुआनला वीज पुरवठ्याचा प्रयत्न करू असे जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here