भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 218.80 कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला

 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 218.80 (2,18,80,50,600) कोटींचा टप्पा पार केला आहे.

16 मार्च 2022 रोजी देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांसाठीची कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. आतापर्यंत 4.10 (4,10,44,847) कोटीपेक्षा जास्त बालकांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे, देशातील 18 ते 59 वर्षे वयोगटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याचे अभियान देखील 10 एप्रिल 2022 सुरु करण्यात आले आहे.

भारतातील रुग्णसंख्या सध्या 34,598 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.08% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.74% झाला आहे.
गेल्या 24 तासांत 3,481 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (साथरोगाच्या आरंभापासून ) 4,40,36,152 झाली आहे.

गेल्या 24 तासात 1,968 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 2,09,801 कोविड निदान चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 89.59 (89,59,58,696) कोटीपेक्षा जास्त चाचण्या केल्या आहेत. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.29% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.94% आहे.

(Source: PIB)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here