गुजरात : मुख्यमंत्री पटेल यांच्याकडून उद्योगांसाठी ‘आत्मनिर्भर गुजरात योजना’ची घोषणा

गांधीनगर : मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी गांधीनगर येथे उद्योगांना मदत करण्यासाठी ‘आत्मनिर्भर गुजरात योजने’ची घोषणा केली. मुख्यमंत्री पटेल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत ‘आत्मनिर्भर भारता’ची संकल्पना मांडली आहे. हे एक असे वर्ष आहे की ज्यामध्ये भारत स्वातंत्र्याचे १०० वे वर्ष साजरे करेल. त्यांच्या नेतृत्वामध्ये भारत जागतिक मंचावर सर्वात गतीने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या रुपात पुढे आले आहे. ते म्हणाले की, ‘आत्मनिर्भर गुजरात योजने’चा उद्देश उद्योग आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा आहे. आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी ही माहिती देताना सांगितले की, गुजरात ही उद्योगाची भूमी आहे. गुजरात भारताचे मॅन्युफॅक्चरिंग हब आहे. पंतप्रधान मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारता’च्या आव्हानाला पूर्ण करण्यात, भारताचे नेतृत्व करण्यासाठी गुजरात आता तयार आहे. मुख्यमंत्री पटेल यांनी असेही सांगितले की ही योजना उद्योगांच्या जागतिक पुरवठा साखळीचा हिस्सा बनण्यासाठी आवश्यक विशेष सहाय्य प्रदान करेल.

‘आत्मनिर्भर गुजरात योजनें’तर्गत उद्योगांना ग्रीन मॅन्युफॅक्चरिंग पद्धतींकडे जाण्यासाठी आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक राहण्यासाठी आणि सीओपी २६ शिखर परिषदेत भारताच्या पंतप्रधानांनी मांडलेल्या “पंचामृत” तत्त्वांशी संरेखित होण्यासाठी डी-कार्बोनायझेशन उपक्रम स्वीकारण्यास प्रोत्साहित करेल. ही योजना नव उद्योजकांना आपल्या उद्यमशीलतेच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यास प्रोत्साहीत करेल. तसेच युवकांना नवा विचार आणि नोकरी देणारे बनण्यासाठीही प्रोत्साहीत करेल. MSMEs, मोठे आणि मध्यम उद्योगाला रोजगाराशी जोडून प्रोत्साहन देणे हे गुजरातच्या औद्योगिक मनुष्यबळाला औपचारिक रूप देण्यात उपयुक्त ठरेल. ते म्हणाले की, हे गुजरातमध्ये नवीन उत्पादन क्षेत्र आणि त्यांच्या सहाय्यक परिसंस्थेच्या विकासासाठी वाढीव संधी निर्माण करेल जे उत्पादन क्षेत्रात जागतिक उदाहरण ठेवेल.

या वेळी उद्योग राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा यांनी सांगितले की, गुजरातमधील सर्वसमावेशक विकास आणि स्थायी रोजगाराच्या संधीमध्ये गुजरातमधील ३३ लाख एमएसएमईचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. याशिवाय राज्याने अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये स्वतःला एका नेत्याच्या रुपात स्थापन केले आहे. आणि हे राज्य गुंतवणुकदारांच्या पसंतीचा पर्याय बनले आहे. ते म्हणाले की, उद्योगाच्या सहाय्यतेसाठी ‘आत्मनिर्भर गुजरात योजनेअंतर्गत एमएमएमई प्रोत्साहनमध्ये छोट्या व्यवसायांसाठी ३५ लाख रुपयांचे भांडवल अनुदान आणि एमएसएमईला दहा वर्षांमध्ये गुंतवणुकीच्या ७५ टक्के एसजीएसटी परतावा या प्रमाणात समावेश आहे. तर मोठ्या उद्योगांना प्रोत्साहनमध्ये निश्चित भांडवल गुंतवणुकीच्या १२ टक्क्यांपर्यंत अनुदान आणि दहा वर्षांसाठी निश्चित गुंतवणुकीच्या ७५ टक्क्यांपर्यंत निव्वळ एसजीएसटी परतावा यांचा समावेश आहे. या योजनेचा प्रारंभ करताना मुख्यमंत्री पटेल यांचे मुख्य प्रधान सचिव कैलाशनाथ, मुख्य सचिव पंकज कुमार, उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राज कुमार, उद्योग आयुक्त डॉ. राहुल गुप्ता आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here