तीन साखर कारखान्यांकडून १०० टक्के ऊस बिले अदा

रुडकी : जिल्ह्यातील डोईवाला, लक्सर, लिब्बरहेडी या तीन साखर कारखान्यांनी या हंगामातील शंभर टक्के ऊस बिले अदा केली आहेत. तर इकबालपूर कारखान्याकडे अद्याप तीन हंगामातील बिले थकीत आहेत. डोईवाला, लिब्बरहेडी साखर कारखान्यापाठोपाठ लक्सर कारखान्याने पूर्ण ऊस बिले दिली. हंगाम २०२१-२२ मध्ये डोईवाला कारखान्याने खूप आधी पूर्ण बिले अदा केली. त्यानंतर लिब्बरहेडी कारखान्याने शेतकऱ्यांना पूर्ण पैसे दिले. आता लक्सर कारखान्याने शेतकऱ्यांचे पैसे बँक खात्यांमध्ये जमा केले आहेत.

लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आणखी काही दिवसांत नव्या हंगामाला सुरुवात होईल. मात्र, इकबालपूर कारखान्याकडे अद्याप तीन हंगामातील बिले थकीत आहेत. कारखान्याकडे २०१७-१८ मधील ११.१४ कोटी रुपये, २०१८-१९ मधील १००.०२ कोटी रुपये आणि यंदाच्या २०२१-२२ या हंगामातील १०.५० कोटी रुपयांची थकबाकी आहे. इकबालपूर ऊस समितीचे सचिव सुज्याश नवानी यांनी सांगितले की कारखान्याने यंदाच्या हंगामातील १० एप्रिलपर्यंतची बिले दिली आहेत. उर्वरित बिले दहा दिवसात शेतकऱ्यांना दिली जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here