गोवा: संजीवनी कारखान्यात इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याचे प्रयत्न

पणजी : गेल्या काही वर्षांपासून बंद असलेला संजीवनी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी गोवा सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. १९७१ मध्ये स्थापन झालेला संजीवनी साखर कारखाना गेल्या काही वर्षांत खराब व्यवस्थापनामुळे वादात सापडला होता. आता राज्य सरकार कारखान्यामध्ये इथेनॉलचे उत्पादन सुरू करण्याचा विचार करीत आहे. यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. कारखान्याच्या पुनर्विकासात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे. याबाबतच्या प्रस्तावात म्हटले आहे की, इथेनॉल प्रकल्पाच्या स्थापनेसोबतच संजीवनी सहकारी साखर कारखान्याचा पुनर्विकास करावा लागेल. कारखान्याचा पुनर्विकास पीपीपी पद्धतीने आणि डिझाइन-बिल्ड-फायनान्स-ऑपरेट-हस्तांतरण (DBFOT) तत्त्वावर केला जाणार आहे.

याबाबत, कृषी विभागाने सांगितले की ते प्रथम राज्य सरकारच्या ई-खरेदी प्रणालीद्वारे अर्ज करण्यासाठी पात्र संस्थांची निवड केली जाईल. आणि निविदा आमंत्रित करण्यात येणार आहेत. इच्छुकांनी त्यांचे अर्ज विहित नमुन्यात २५ नोव्हेंबरपर्यंत पाठवणे आवश्यक आहे. ३१ ऑक्टोबर रोजी अर्जापूर्वीची प्री बिड मिटिंगदेखील नियोजित करण्यात आली आहे. तिथे इच्छुक घटकांना बोली प्रक्रियेचे स्पष्टीकरण आणि तांत्रिक तपशील प्राप्त करण्याची संधी असेल.

राज्य सरकारने कारखाना सुरू करण्याच्या योजनेबाबत सल्ला देण्यासाठी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन, पुणे यांची नियुक्ती केली होती. आणि त्यानंतर इथेनॉल उत्पादन प्रकल्पासह मिलच्या पुनर्विकासासाठी तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता अहवाल आणि प्रकल्प अहवाल सादर करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here