उत्तर प्रदेश : मेरठमधील शेतकऱ्याने १६ फूट लांब ऊस पिकवून उत्पादन केले दुप्पट

मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्हा ऊस उत्पादनासाठी ओळखला जातो. राज्याच्या पश्चिम भागातील अनेक जिल्हे यात अग्रेसर आहेत. यादरम्यान एका ऊस उत्पादक शेतकऱ्याची पिकाची चर्चा सुरू झाली आहे. मेरठमधील चंद्रहास या शेतकऱ्याने आपल्या शेतात लांब ऊसाचे उत्पादन केले आहे. या उसाची लांबी १६ फूट आहे. त्यामुळे त्याविषयी कुतूहल वाढले आहे. साधारणपणे उसाची लांबी ५ ते ७ फूट असते. मात्र, त्यात वाढ व्हावी यासाठी सतत संशोधन सुरू आहे. नव्या प्रजातींचा शोध घेतला जात आहे. शेतकरीही यासाठी अविरत कष्ट घेत आहेत.

झीन्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, मेरठमधील हा शेतकरी तब्बल १६ फूट लांब ऊस पिकवून चर्चेत आला आहे. चंद्रहास यांनी सांगितले की, ऊस लावण करताना त्यांनी केलेल्या बीज प्रक्रियेमुळे, विविध उपायांमुळे उसाची लांबी वाढली आहे. बियाणे तयार करण्यात महिलांनी मोठे योगदान दिले आहे. यातून ग्रामीण महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगारही निर्माण झाला आहे. चंद्रहास यांनी सांगितले की, त्यांनी स्ट्रेंच पद्धतीचा अवलंब केला. त्यातून उसाची मुळे घट्ट झाली. उसाची लांबी वाढल्याने उत्पादन वाढणार आहे. त्यामुळे शेतकरी चंद्रहास यांचेही उत्पन्न चांगलेच वाढेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here