युपी : ऊस गळीत हंगाम २०२२-२३ साठी २० ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन घोषणापत्र देण्याचा पर्याय खुला

उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन तथा त्यांच्या सूचनांच्या दृष्टीने ईआरपीची वेबसाईट enquiry.caneup.in वर ऑनलाइन घोषणापत्र भरण्याची मुदत वाढवून २० ऑक्टोबर २०२२ करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती देताना ऊस तथा साखर आयुक्त संजय भुसरेड्डी यांनी सांगितले की, राज्यात जवळपास १५ टक्के शेतकरी असे आहेत, ज्यांना विविध कारणांनी, जसे इंटरनेटचे स्लो स्पीड, बिझी सर्व्हर आदी समस्यांमुळे घोषणापत्र भरता आले नाही. अशा शेतकऱ्यांकडून सुविधा तसेच विभागाच्या टोल फ्री कमांक १८००-१२१-३२०३ या क्रमांकावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी घोषणापत्र भरण्याची मुदत वाढविण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात येत आहे. घोषणापत्र भरण्याची अंतिम मुदत शेतकऱ्यांच्या हितासाठी २० ऑक्टोबर २०२२ पर्यंत वाढविण्यात आली आहे. हा निर्णय ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरेल. Smart Ganna Kishan (SGK) प्रोजेक्ट अंतर्गत ऊस गळीत हंगाम २०२२-२३ साठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून ऑनलाईन घोषणापत्र यशस्वीपणे भरले जात आहेत. ते म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांना निशुल्क घोषणापत्र भरण्यासाठी विविध कार्यालये तथा उप ऊस आयुक्त, जिल्हा ऊस अधिकारी, ज्येष्ठ ऊस विकास निरीक्षक, सचिव तसेच कारखान्यांच्या ऊस व्यवस्थापन कार्यालयांत सुविधा दिली गेली आहे. यासह ४५१ शेती केंद्रांची (Farmer Help Desk) स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रांवर घोषणापत्र भरण्यासाठी विभागीय कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मदत केली जात आहे.

राज्यातील उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने २० ऑक्टोबर २०२२ पर्यंत घोषणापत्र भरावे. त्यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही. अशा शेतकऱ्यांना इतर सुविधा मिळणार नाहीत असे सांगण्यात आले आहे. ऊस आयुक्तांनी ऊस पर्यवेक्षकांना आपल्या विभागातील शेतकऱ्यांकडून घोषणापत्र भरून घेण्यास प्रोत्साहन द्यावे असे सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here