मनिला : फिलिपाइन्सला गेल्या हंगामातील पिकाच्या कमी उत्पादनामुळे बफर स्टॉक वाढविण्यासाठी अतिरिक्त २,००,००० मेट्रिक टन (एमटी) प्रक्रियाकृत आणि कच्ची साखर आयात करण्याची गरज भासू शकते असे अमेरिकेच्या कृषी विभागाने (USDA) म्हटले आहे. युएसडीएने सांगितले की, यामध्ये १,२५,००० मेट्रिक टन रिफाईंड साखर आणि ७५,००० मेट्रिक टन कच्ची साखर यांचा समावेश असेल. आपल्या परदेशी कृषी सेवेच्या (एफएएस) नव्या अहवालात युएसडीने म्हटले आहे की, ७५,००० मेट्रिक टन कच्च्या साखरेची आयात कमी साखर उत्पादन आणि शिल्लक साठ्याच्या स्वरुपात बफर स्टॉक वाढविण्यास उपयुक्त ठरेल.
एसआरएद्वारे मासिक बफर स्टॉक १,६०,००० मेट्रिक टनावर निश्चित करण्यात आला आहे. ऑगस्टच्या अखेरीस देशात केवळ १,२५,५७२ मेट्रिक टन बफर स्टॉक उपलब्ध होता. युएसडीने चालू पिक वर्षातील साखर उत्पादनाचे आपले अनुमान घटवून १.८५ मिलियन मेट्रिक टन केले आहे. खराब हवामान, खतांच्या वाढत्या किमती यामुळे दोन मिलियन टनाच्या आपल्या प्रारंभीच्या अनुमानापेक्षा कमी साखर उत्पादन होईल असे युएसडीएचे म्हणणे आहे.