सोलापूर : केंद्र सरकारकडून पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉलच्या वापरास मंजुरी दिल्यानंतर इथेनॉलच्या मागणीत वाढ झाली आहे, असे भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. ते म्हणाले, भीमा साखर कारखाना भविष्यातील बाजारपेठेची गरज लक्षात घेवून इथेनॉल प्लांट स्थापन करेल.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर गावातील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या २०२२-२३ मधील ४३ व्या हंगामातील बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभात खासदार महाडिक बोलत होते. यावेळी मंगलताई महाडिक, विश्वास महाडिक, विश्वजीत महाडिक, उपाध्यक्ष सतीश जगताप, शिवाजी गुंड, भरत पाटील, सुरेश शिवपुजे, महादेव देठे, विक्रम डोंगरे, सज्जन पवार, दत्ता कदम, शंकर वाघमारे, संभाजी पाटील, राहुल व्यवहारे, आबासाहेब शिंदे, तात्या नागटिळक, कार्यकारी संचालक सुर्यकांत शिंदे उपस्थित होते.