महागाईचा भडका: दोन दिवसांत गहू, तांदूळ, डाळीच्या दरात पाच टक्के वाढ

नवी दिल्ली : गेल्या दोन दिवसांत जीवनावश्यक अन्नधान्याच्या किमतीत जोरदार वाढ झाली आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गहू, आटा, तांदूळ, डाळीसह तेल, बटाटा, कांदा यांच्या दरात पाच टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार तांदळाचा दर नऊ ऑक्टोबर रोजी ३७.६५ रुपये प्रती किलो होता. तर मंगळवारी हा दर ३८.०६ रुपयांवर पोहोचला. गव्हाचा दर ३०.०९ रुपयांवरून वाढून ३०.९७ रुपये तर आट्याचा दर ३५ रुपयांवरून ३६.२६ रुपये किलो झाला आहे. बटाट्याचा दर २६.३६ रुपये प्रती किलोवरून २८.२० रुपये झाला आहे. तर कांदा २४.३१ रुपयांवरून २७.२८ रुपयांवर पोहोचला आहे. टोमॅटोचा दर ४३.१४ रुपायंवरून ४५.९७ रुपये प्रती किलो झाला आहे.

अमर उजालामधील वृत्तानुसार, डाळीच्या किंमती ७१.२१ रुपयांवरून ७४ रुपयांवर पोहोचल्या आहेत. उडीद डाळ १०६.५३ रुपयांवरून १०८.७७ रुपये झाली आहे. मूग डाळ १०१.५४ रुपये प्रती किलोवरून १०३.७६ रुपयांवर पोहोचला आहे. मसूर डाळ ९४.१७ रुपयांवरून ९५.७६ रुपये प्रती किलो झाली आहे. साखरेचा दर ४१.९२ रुपयांवरून ४२.६६ रुपये प्रती किलो झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here