नवी दिल्ली : पंतप्रधान किसान योजनेचा १२ वा हप्ता सोमवारी, १७ ऑक्टोबर रोजी ८ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही रक्कम डीबीटी हस्तांतरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली आहे. सप्टेंबर महिन्यापासून शेतकरी या हप्त्याची वाट पाहात होते. मात्र, जमीन नोंदीच्या पडताळणीमुळे हप्ता उशीरा जमा झाला आहे. दिवाळीपूर्वीच सरकारने शेतकऱ्यांना ही भेट दिली आहे.
आज तकवर प्रकाशीत वृत्तानुसार, शेतकऱ्यांच्या खात्यावर २ हजार रुपयांचा हप्ता जमा करण्यात आला आहे. जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाला नसेल तरी तुम्ही घाबरून जावू नका. हप्ता आला नसल्यास तुम्ही अधिकृत शासकीय मदतीसाठी ईमेल आईडी pmkisan-ict@gov.in वर संपर्क करू शकता. पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन नंबर- १५५२६१ अथवा १८००११५५२६ (Toll Free) अथवा ०११-२३३८१०९२ वर संपर्क साधू शकता. जर तुम्ही योजनेला पात्र असाल तर हा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्येही जमा होऊ शकतो.