भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 25,510

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 219.46 (2,19,46,34,236) कोटींची संख्या ओलांडली आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 4.11 (4,11,94,276) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

भारतातील रुग्णसंख्या सध्या 25,510 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.6% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.76% झाला आहे. गेल्या 24 तासांत 2,579 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (साथरोगाच्या सुरूवातीपासून ) वाढून 4,40,82,064 झाली आहे.

गेल्या 24 तासात 2,141 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 2,51,515 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 89.94 (89,94,39,208) कोटींपेक्षा जास्त चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.97% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.85% आहे.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here