हरिद्वार : ऊस मंत्री सौरभ बहुगुणा यांनी माजी कॅबिनेट मंत्री स्वामी यतीश्वरानंद यांची डेहराडूनमध्ये भेट घेवून शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत चर्चा केली. ऊस खरेदी केंद्रे सुसज्ज ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी ऊस समित्या, साखर कारखान्यांच्या व्यवस्थापकांनी शेतकऱ्यांच्या सहमतीने केंद्रे सुरू करण्याचा सल्ला दिला.
हरिद्वार जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांच्या ऊस खरेदी केंद्र बदलण्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. ऊस वजन केंद्रे बदलली जावू नयेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे, असे स्वामी यतीश्वरानंद यांनी सांगितले. केंद्रे पूर्ववत करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. जर केंद्रे बदलणे गरजेचे असेल तर शेतकऱ्यांशी सामंजस्याने चर्चा करावी आणि बैठक घेऊन निर्णय घेतले जावेत असे त्यांनी सांगितले.
ऊस मंत्री सौरभ बहुगुणा यांनी आश्वासन दिले की, शेतकऱ्यांच्या हिताकडे जर दुर्लक्ष केले गेले, तर साखर कारखान्याच्या प्रशासनावर कारवाई केली जाईल. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी शेतकऱ्यांच्या हितासाठी जागरुक आहेत. शेतकऱ्यांच्या सल्ल्याशिवाय कोणताही निर्णय घेवू नये असे त्यांनी ऊस समित्या तसेच साखर कारखान्यांच्या व्यवस्थापकांना निर्देश दिले आहेत.