सरकारने ऊस दर ५०० रुपये प्रती क्विंटल जाहीर करण्याची मागणी

सहारनपूर : थकीत ऊस बिले मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे भारतीय किसान युनियनचे (टिकैत) जिल्हाध्यक्ष चौधरी राजपाल सिंह यांनी सांगितले. राज्य सरकारने ऊस दर ५०० रुपये प्रती क्विंटल जाहीर करावा अशी मागणी त्यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित बैठकीत जिल्हाध्यक्ष राजपाल सिंह म्हणाले की, सणासुदीचे दिवस असूनही शेतकऱ्यांचे हात रिक्त आहेत. ऊस बिले मिळाली नाहीत तर त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागेल. लवकरात लवकर बिले दिली नाहीत, तर भारतीय किसान युनियनच्यावतीने धरणे आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, विनय कुमार चौधरी म्हणाले की, विज विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांचे शोषण करीत आहेत. कुपनलिकांवर वीजेचे मिटर बसवू दिले जाणार नाहीत. ते म्हणाले की, शेतकऱ्यांचे शोषण कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. अशोक कुमार, अमित मुखिया, बबलू प्रधान, संजय चौधरी, प्रवीन कुमार, अनूप सिंह, रघुवीर सिंह, सोनू चौधरी, पहल सिंह, राव नौशाद, मुकेश तोमर आदींची भाषणे झाली. रामपाल, पप्पू, रविंद्र, अनीस, धर्मवीर, अनिल, यशपाल, सुरेश प्रमुख, अजय कुमार, गजेंद्र, रामवीर, मंशा प्रधान आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here