नवी दिल्ली : भारतीय इंधन कंपन्यांनी नेहमीप्रमाणे शनिवारी, २२ ऑक्टोबर रोजी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. राष्ट्रीय बाजारात वाहनांचे इंधन दर स्थिर आहेत. देशभरात २२ ऑक्टोबर रोजी पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसह देशभरात सर्व शहरांत इंधनाचे दर जैसे थे आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरातील उतार-चढावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय बाजारात २२ मेपासून आजअखेर पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत ९६.७२ रुपये आणि डिझेलची किंमत ८९.६२ रुपये प्रती लिटर आहेत.
आज तकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल १०६.२१ रुपये आणि डिझेलचा दर ९४.२७ रुपये प्रती लिटर आहे. याशिवाय कोलकातामध्ये पेट्रोल ९२.७६ रुपये तर डिझेल १०६.०३ रुपये प्रती लिटर आहे. चेन्नईत पेट्रोलची किंमत १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रती लिटर आहेत. राज्यांच्या स्तरावर लागू केल्या जाणाऱ्या विविध करांमुळे वेगवेगळ्या राज्यांत पेट्रोल, डिझेलच्या किमती वेगवेगळ्या आहेत. एका SMSवर तुम्ही शहरातील पेट्रोल, डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP लिहून मेसेज ९२२४९९२२४९ वर पाठवावा लागेल. आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड ऑईलच्या आधारावर ऑईल मार्केटिंग कंपन्या किमतीचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल, डिझेलच्या दरांची निश्चिती करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्या विविध शहरांतील इंधन दरात अपडेट करतात.